गायन | |
 
 
 

सौ. मंजिरी जोशी यांनी "मधुरजनी' या संस्थेची 2000 साली स्थापना केली. त्यांचा स्वतःचा गायन आणि निवेदनातला अनुभव त्यांच्या विद्दयार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. संस्थेमार्फत गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षांना बसण्याचीही सोय आहे. आजवर संस्थेच्या 6 विद्यार्थिनींनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे.
दरवर्षी विद्यार्थिनींना घेऊन एक व्यावसायिक स्तरावरचा कार्यक्रम उभा केला जातो.
मधुरजनी'त 5 ते 65 वयाच्या विद्यार्थिनींना प्रवेश आहे

तरूण विद्यार्थिनींसाठीगाण्यामध्ये करीअर करणे अथवा केवळ आनंदासाठी गाणे...उद्देश काहिही असला तरी पाया भक्कम असलाच पाहिजे. "मधुरजनी' ह्याचसाठी काम करते. आजच्या धकाधकीच्या काळातस्वतःचा छंद जोपासून समृध्द होता यावे ही "मधुरजनी'ची धारणा आहे. संस्थेच्या काही विद्यार्थिनींनी स्वतःचे कार्यक्रम सादर करायला सुरवात केली आहे.

लहान मुलांसाठी मधुरजनीमध्ये 5 वर्षांपासूनच्या लहान मुलांना संगीत शिकवले जाते. (मुले आणि मुली)
लहान मुलांवर उत्तम संगीत आणि भाषेचे संस्कार झाले तर त्यांचा विकास चांगला होतो.
संगीताबरोबरच त्यांचा दृष्टीकोन कलात्मक घडवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
स्वरज्ञान आणि बालगीते यांचा एक अभ्यासक्रम खास त्यांच्यासाठी तयार केला आहे.

ज्येष्ठांसाठीया वयात संगीत शिकून मानसिक स्वास्थ्य नक्की मिळवता येते. समविचारी, समछंदी स्त्रियांमध्ये मन रमवता येते. "मधुरजनी'तल्या अनेक स्त्रियांना हा अनुभव आलेला आहे.
यांनाही रंगमंचीय कार्यक्रमांत सहभागी होता येते.